मनोज कुमार यांच्या अस्थींचे गंगेत विसर्जन   

हरिद्वार : अभिनेेते मनोज कुमार यांच्या अस्थींचे विसर्जन शनिवारी गंगा नदीत करण्यात आले. या वेळी हर की पौडी येथे कुटुंबातील सदस्य आले होते. त्यामध्ये पत्नी शशी, मुलगा कुणाल आणि विशाल गोस्वामी यांचा समावेश होता.
 
ब्रह्मकुंड घाटावर पुरोहितांनी धार्मिक अनुष्ठान केले. मनोज कुमार यांनी देशभक्तीवरील  उपकार, पूरब और पश्चिम आणि क्रांती सारख्या लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यामुळे ते भारत कुमार या नावाने प्रसिद्ध होते. गेल्या आठवड्यात ४ एप्रिल रोजी त्यांचे निधन झाले होेते. त्यांचे खरे नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी असे होते. मात्र, चित्रपटसृष्टीत त्यांनी मनोज कुमार हे नाव स्वीकारले होते. दरम्यान, कुणाल गोस्वामी यानी सांगितले की, बाबांच्या आत्म्याला शांती मिळावी, दिव्यधाम प्राप्त व्हावे, अशी प्रार्थना कुटुंबीयांनी देवाकडे केली असून त्यांच्या अस्थींचे विसर्जन गंगेत केले. 

Related Articles